Nagpur MLC Election : कॉंग्रेसवर काही तास आधी उमेदवार बदलण्याची नामुष्की…

नागपूर : राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी चार जागी बिनविरोध निवडणूक होणार असली तरी नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत होणार आहे. नागपुरात आता मतदानाला १२ तास शिल्लक असताना ऐन वेळी काँग्रेस ने आपला उमेदवार बदलला आहे.

भाजपला रामराम ठोकत काँग्रेसशी नाते जोडणाऱ्या नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांना डावलून आता काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश सुधारकार देशमुख यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाच्या निवडणुकीला वेगळच वळण आलं आहे.

काँग्रेसने डॉ. भोयर यांना डच्चू का दिला ?

रा. स्व. संघाचे निष्ठावान कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोयर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीची साथ सोडून काँग्रेसच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसने विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात डॉ. रवींद भोयर यांना उमेदवारी दिली. पण असे करताना काँग्रेसने नगरसेवक असलेले प्रफुल्ल गुडदे यांनाही उमेदवारी अर्ज भरायला सांगितले होते. अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रफुल्ल गुडदे यांनी अर्ज मागे घेतला. आता निवडणुकीला १२ तास शिक्कल असताना काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश सुधारकार देशमुख यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. त्या करीत काँग्रेसच्या वतीने पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात डॉ रवींद्र भोयर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखविली असल्याचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील पहा