आजकाल फडणवीसांपेक्षा जास्त त्यांच्या पत्नीच्या गाण्यांचे व्हिडिओ पाहिले जातात, काँग्रेस नेत्याने उडवली खिल्ली

Kanhaiya Kumar Criticize Devendra Fadnavis: काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. राज्यातील सद्यपरिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी फडणवीसांची दया येते, कारण आजकाल त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या गाण्यांचे व्हिडिओ पाहिले जातात, अशा शब्दांत टीका केली आहे.

आजकाल देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या (अमृता फडणवीस) गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात. मला फडणवीसांची दया येते, देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत आहे, असे म्हणत कन्हैया कुमार यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

तसेच भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपामध्ये येताच अचानक पवित्र होतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत