Crime News: भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; शिंदे गटाच्या आमदाराची दादागिरी वाढली?

जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, आज (गुरूवारी) सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनीच मला मारहाण केली, असा आरोप संबंधित मारहाण झालेल्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.