मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी; इस्रायली पंतप्रधान हा एक जुलमी सैतान – ओवेसी 

Israel-Palestine War: इस्रायलने हमासचा (Israel-Hamas Conflict) पूर्ण सफाया करण्याचा प्रण घेतला असून आता हमासचे कॅश-टू-क्रिप्टो जागतिक आर्थिक नेटवर्क नष्ट करण्यावर इस्रायलनं लक्ष केंद्रित केलं आहे. धर्मादाय संस्था आणि मैत्रीपूर्ण राष्ट्रांनी हमासचं समर्थन बंद करावं हा त्यांचा उद्देश आहे. या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेला मिळणाऱ्या निधीवर अंकुश ठेवण्यासाठी इस्रायलच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे धोरणात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे.

हमास ही दहशतवादी संघटना असल्याचं अनेक देशांनी मान्य केलं आहे परंतु हमासला काही देणगीदार, धर्मादाय संस्था आणि परदेशी लोक यांची सहानुभूती असून हमासनं त्यांच्याकडून निधी मिळवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक नेटवर्कचा गैरवापर केल्याचं मानलं जातं. याला प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलनं हमास च्या या निधी यंत्रणेत हस्तक्षेप करून त्यात व्यत्यय आणण्याचे प्रयत्न वाढवले आहेत.

हमास-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गाझामधील लोकांच्या बाजुने उभं राहण्याची आणि इस्रायल-हमास युद्धात होरपळलेल्या हजारो निष्पाप लोकांना मदत करावी, असं आवाहन केलं आहे.

मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे आणि यापुढेही उभा राहीन. आजही इस्रायलविरोधात लढणाऱ्या गाझातील लाखो शूरवीरांना माझा सलाम! नेतान्याहू (इस्रायली पंतप्रधान) हा एक जुलमी सैतान आणि युद्ध गुन्हेगार आहे. आपल्या देशातील एक बाबा मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) म्हणाले की, पॅलेस्टाईनचे नाव घेणाऱ्यांवर खटले दाखल केले जातील. तर मी त्या बाबा मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मी आपल्या तिरंग्यासह अभिमानाने पॅलेस्टाईनचा झेंडाही धारण करतो. मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे,असं विधान ओवेसी यांनी केलं. ते हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा