संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा भन्नाट डान्स

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत विवाहबंधनात अडकत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. यामुळेच या हायप्रोफाईल विवाह सोहळ्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला.

दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा संजय राऊत आणि पवार कुटुंबातील स्नेहसंबंध समोर आले आहेत.