रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पादुकोणची एन्ट्री, बनणार ‘लेडी सिंघम’

Singham Again: बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Director Rohit Shetty) याच्या कॉप युनिव्हर्समध्ये अभिनेत्री दिपीका पादुकोण (Deepika Padukone) हिची एन्ट्री झाली आहे. दिग्दर्शक रोहितने त्याचा नवा सिनेमा सिंघम अगेनची घोषणा केली आहे. या सिनेमात दीपिका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत असेल, असेही रोहितने सांगितले आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा रोहितने दिग्दर्शन केलेल्या सिनेमात महिला पोलिस मुख्य भूमिकेत असेल. या घोषणेनंतर दीपिका आणि सिंघम चित्रपटाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सिंघम अगेन चित्रपटात दीपिकाबरोबरच अभिनेता अजय देवगणही (Ajay Devgan) असणार आहे. अजय पुन्हा एकदा त्याच्या प्रसिद्ध बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसेल. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एका सिनेमात अजय आणि दीपिका एकत्र काम करतील. दीपिकाला लेडी सिंघमच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.