‘भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिटही बुक केलं होतं, एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला’

मुंबई: भाजप नेते मोहित कंभोज (BJP leader Mohit Kambhoj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे.

कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला आणि 22 जून रोजी बंडखोर आमदार गटात सामील होण्याची विनंती केली. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवण्यास योग्य नसल्यामुळे त्यांना गटात घेण्यास एकनाथ शिंदेजी नाखूष होते. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केले. भास्कर जाधव हे सत्य नाकारू शकतात का? .