दिल्ली कॅपिटल्स शार्दुल ठाकूर, श्रीकर भरत यांच्यासह 5 खेळाडूंना रिलीज करणार ?

नवी दिल्ली – शार्दुल ठाकूर, श्रीकर भरत आणि न्यूझीलंडच्या टीम सेफर्टसह पाच खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगच्या 15 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी रिलीज करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मनदीप सिंग आणि आंध्रचा सलामीवीर अश्विन हेब्बर यांनाही दिल्ली संघ सोडू शकतो असं चित्र आहे.

लिलावात दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकूरला १० कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले. शार्दुल ठाकूरने 2022 च्या मोसमात 14 सामन्यांत 5 विकेट घेतल्या होत्या. या दरम्यान, प्रत्येक षटकात सुमारे 10 धावांच्या धावगतीने धावा दिल्या गेल्या. शार्दुल ठाकूरला 10.81 च्या सरासरीने आणि 137.93 च्या स्ट्राईक रेटने बॅटने केवळ 120 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सला शार्दुल ठाकूरला इतर संघात बदलण्याची इच्छा होती, परंतु तसे झाले नाही.

शार्दुल ठाकूरची प्रचंड किंमत लक्षात घेऊन फ्रेंचायझी डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावापूर्वी त्याला सोडण्यास तयार आहे. आयपीएलच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, शार्दुल हा एक अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे पण त्याची किंमत हा एक मुद्दा आहे.हेब्बर, मनदीप, सेफर्ट आणि भरत यांनाही सोडले जाऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्सने गेल्या मोसमात एकही सामना न खेळलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार यश धुलला कायम ठेवण्याची तयारी केली आहे. दिल्लीचा संघ 2022 च्या हंगामात 10 संघांपैकी पाचव्या स्थानावर होता. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.