महाविकास आघाडीने जे धाडस दाखवलं नाही शिंदे सरकारने करून दाखवलं; शीतल म्हात्रेंनी केलं सरकारचं कौतुक

मुंबई – शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून आज माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीजवळ करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पाडल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हिंदुत्ववादी सरकारचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी अभिनंदन केले आहे.

हे अनधिकृत बांधकाम पडून टाकावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून राज्यातील शिवप्रेमी जनता करत होती मात्र राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीने ते धाडस दाखवलं नाही मात्र राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी हे करून दाखवल्याबद्दल राज्यातील तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीने शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचे जाहिर आभार मानले आहेत.