धक्कादायक! आईच बनली काळ, स्वत:च्या हातांनी घेतला ४ वर्षीय मुलाचा जीव

Suchana Seth News: मंगळवारी (9 जानेवारी) न्यायालयाने 39 वर्षीय एआय कंपनीच्या सीईओ सुचना सेठ यांना त्यांच्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सेठला गोव्यातील मापुसा येथील जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले.

उत्तर गोव्याचे एसपी निधीन वल्सन म्हणाले, “एका महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना बेंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करण्यास सांगितले. चेकआऊटनंतर जेव्हा हॉटेलचे कर्मचारी खोली स्वच्छ करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना लाल डाग दिसले. हे पाहून त्यांना वाटले की हे रक्त आहे. कर्मचाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले आणि चालकाच्या माध्यमातून महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.”

वल्सन पुढे म्हणाले, “पोलिसांनी महिलेची तिच्या मुलाबद्दल चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की मूल तिच्या मित्राकडे राहत आहे.” महिलेने दिलेला घरचा पत्ता खोटा निघाला. चालकाला गाडी पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. महिलेच्या सामानाची तपासणी केल्यानंतर पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडला. यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

वास्तविक, लिंक्डइनवरील सेठच्या पेजनुसार, ती स्टार्ट-अप कंपनी ‘माइंडफुल एआय लॅब’ची सीईओ आहे.

पोलीस काय म्हणाले?
कळंगुट पोलिस ठाण्याचे निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले की, आरोपी महिला 6 जानेवारीला तिच्या मुलासह उत्तर गोव्यातील कँडोलीम येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये पोहोचली होती. त्यांनी सांगितले की, दोन दिवस तिथे राहिल्यानंतर सुचना सेठने फ्लॅट कर्मचाऱ्यांना सांगितले की, मला काही कामासाठी बंगळुरूला जायचे आहे. तसेच त्यांना टॅक्सीची व्यवस्था करण्यास सांगितले.

नाईक म्हणाले, “कर्मचाऱ्यांनी महिलेला सांगितले की ती बेंगळुरूला विमानाने जाऊ शकते कारण टॅक्सीने जाणे महाग होईल. ती टॅक्सीनेच जाईल असा सेठचा आग्रह होता. 8 जानेवारीला टॅक्सीची व्यवस्था केल्यानंतर ती पहाटे बेंगळुरूला निघाली. त्यानंतर कर्मचारी ती राहत असलेल्या खोलीची साफसफाई करण्यासाठी गेले असता त्यांना टॉवेलवर रक्ताचे डाग आढळून आले. कळंगुट पोलिसांना याची माहिती तात्काळ देण्यात आली आणि एक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महिलेच्या बॅगची झडती घेतली असता त्यांना त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला,” असे नाईक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”