सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

पुणे – स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात राष्ट्रीय शिक्षण दिवस (National Education Day) साजरा करण्यात आला.

यावेळी सहयोगी प्राध्यापक वैभव जाधव (Vaibhav Jadhav) यांनी मौलाना आझाद यांच्या जीवनाची आणि शैक्षणिक कार्याची माहिती विभागातील विद्यार्थ्यांना दिली.आझाद यांच्या पुढाकारानेचं यूजीसी,आयआयटी आणि जामिया मिलिया आदी शिक्षणं संस्था उभ्या राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तर प्राध्यापक गायत्री चौकाडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. यावेळी विभागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.

सन २००८ सालापासून मानव संसाधन विकास मंत्रालयाने मौलाना आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून घोषित केला आहे.यंदाच्या वर्षाची थीम चेंजिंग कोर्स, ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन आहे.