शोएब मलिक-सानिया मिर्झाच्या सुखी संसारात विष कालवणारी ‘ती’ कोण आहे?

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा १२ वर्षांचा सुखी संसार मोडकळीस आल्याच्या चर्चा आहेत. काहींनी सानिया आणि शोएबचा घटस्फोट (Sania Mirza Shoaib Malik Divorce) झाला असल्याचेही सांगितले आहे. मात्र अद्याप सानिया किंवा शोएब यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएबने एका परस्त्रीसाठी सानियाला दूर केले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. ही स्त्री आणखी कोण नसून पाकिस्तानची अभिनेत्री आयशा उमर (Ayesha Omar) आहे.

आयशासोबत शोएबच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्या दोघांचे एकत्र काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शोएब आणि आयशा उमर गेल्या महिन्यात एकत्र दिसले होते. एका मॅगझिन फोटोशूटमध्ये दोघेही खूप जवळ दिसले होते. हे फोटोशूट स्विमिंग पूलमध्ये झाले होते आणि त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

आता शोएब आणि सानियामध्ये सर्वकाही आलबेल नसताना आयशाचे नाव पुढे येत आहे. आयशासोबत शोएबचे अफेअर सुरू असल्याचा कयास चाहते लावत आहेत.

कोण आहे आयशा उमर?
१२ ऑक्टोबर १९८१ रोजी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आयशाचा जन्म झाला. ती पाकिस्तानातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने पाकिस्तानासाठी गाजलेल्या जिंदगी गुलजार है, या मालिकेत काम केलं होतं.

आयशाला एक भाऊ देखील आहे. आयशा लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा तिच्या आईने लहान भावाचा आणि आयशाचा सांभाळ केला. आयशाने नॅशनल स्कूल ऑफ बॅचलर्स आणि मास्टर्सची पदवी घेतली आहे. ती शाळा-कॉलेजपासून नाटकात काम करु लागली होती.

सुरुवातील आयशाने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने असंख्य जाहिरातीत काम केलंय. लैंगिक शोषणाचाही आयशाला सामना करावा लागला होता. हीच गोष्ट २०२० साली तिने एका पाकिस्तानी कार्यक्रमातच सांगितली होती.

फक्त पाकिस्तानी मालिकाच नाही, तर पाकिस्तानी सिनेमांमध्येही तिने काम केलंय. लव मे हम आणि मैं हू शाहिद अफरीदी या सिनेमातील आयटम नंबरही परफॉर्म केला आहे. हे दोन्ही सिनेमा हिटही झाले होते. शिवाय २०१८ साली न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये आयशाने पाकिस्तानच प्रतिनिधित्व केलं होतं.

‘आझाद मराठी’चा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा