उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीस भेट देऊन केली पाहणी

Deputy Minister Ajit Pawar: सोलापूर शहराला (Solapur City) ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज (ऐतिहासिक वारसा) इमारत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत (Smart City Scheme) नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेने केलेल्या कामाचे कौतुक केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचे सूक्ष्म निरीक्षण केले. ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरणात करण्यात आलेल्या कामांची माहिती घेऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या इमारतीचे नूतनीकरण महापालिकेने अत्यंत उत्कृष्टपणे करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महापालिकेचे कौतुक केले. तसेच पाहणी करत असताना त्यांना आढळलेल्या त्रुटीबाबत महापालिका आयुक्तांना सांगून त्यात आवश्यक ते बदल करण्याविषयी सूचना दिल्या. तसेच या इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का बसणार नाही यासाठी महापालिकेने उचित पावले उचलावी असेही सांगितले.

सुरुवातीला महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूर महापालिकेने इंद्रभुवन इमारतीचे केलेल्या नूतनीकरण विषय कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा असलेली सोलापूर महापालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या इमारतीच्या मूळ सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता इमारतीचे नूतरीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस