पुण्याचे पाणी कपात करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील – देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे शहराचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. पुणे महापालिकेत नवीन ३४ गावं समाविष्ठ झाल्यानंतर साधारणपणे ५ लाख लोकसंख्या वाढली आहे. अशात पुणे शहराचा पाणी कोटा वाढवणे अपेक्षित होते. मात्र आता खडकवासला धरणातील पाणी वाटपावर थेट पाटबंधारे विभाग नियंत्रण करणार असून, पोलिस बंदोबस्तात पुण्याचे पाणी कपात केले जाणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यावरून आता खुद्द महापौर मुरलीधर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका सध्या खडकवासला धरणातून १४६० एमएलडी आणि भामा खासखेड धरणातून १८० एमएलडी पाणी रोज वापरत आहेत. हा पुरवठा आता कमी केला जाणार आहे.

यावर आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत महाविकास आघाडीवर शरसंधान साधले आहे. ‘पुण्याचे पाणी कोणी कमी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत.’ असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पुण्यात भाजपच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

हे देखील पहा