Mukesh Khanna | ‘ती सुरुवातीपासूनच…’, झीनत अमानच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या विधानावर मुकेश खन्ना यांचा पलटवार

Mukesh Khanna | झीनत अमान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 70 च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच काही चाहत्यांना रिलेशनशिपचा सल्ला देताना ‘सत्यम शिवम सुंदरम’ अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लग्नासारखा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही जोडप्याने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असले पाहिजे असे म्हटले होते.

त्यांच्या चाहत्यांना त्यांचे विधान आवडले असतानाच काही जुन्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. मुमताज आणि सायरा बानोनंतर आता शक्तीमान फेम अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी झीनत अमानच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विचारपूर्वक बोलावे झीनत अमान
मुकेश खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते आहेत जे आपल्या स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. काही काळापूर्वी त्यांनी रणवीर सिंगची ‘शक्तिमान’च्या भूमिकेसाठी निवड करण्यावर आक्षेप घेतला होता. आता अलीकडेच दैनिक जागरणशी बोलताना त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपवर दिग्गज अभिनेत्रीने दिलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले,

“आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात लिव्ह-इन रिलेशनशिपसारखी गोष्ट कधीच ओळखली गेली नाही. ती पाश्चात्य सभ्यतेतून आली आहे. झीनत अमान याविषयी जे काही बोलत आहेत, त्या पहिल्या दिवसापासूनच पाश्चात्य सभ्यतेनुसार आपले जीवन जगत आहेत. झीनत काय म्हणतेय की एक मुलगा आणि मुलगी लग्नाच्या माध्यमातून एकमेकांना ओळखू शकत नाही, तर त्या दोघांचे काय होईल याची कल्पना करा जे असे बोलत आहेत, त्यांनी विचारपूर्वक बोलावे,” असा सल्ला मुकेश खन्नाने दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला