सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; प्रशासन,सत्ताधारी आणि डॉक्टरांच्या विरोधात भाजप आक्रमक

bjp - doctor

मुंबई : नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या उदासीन कृतीचा निषेध करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती सभेत संपूर्ण सभा तहकुबी मांडली.

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये सहा महिने वय असलेल्या एका तान्ह्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले होते. या चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नायर रुग्णालयात प्रशासनाच्या / डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या सुरुवातीच्या एक तासापेक्षा जास्त वेळ (गोल्डन अवर) डॉक्टरांनी कोणतेही उपचार न केल्यामुळे त्यातील छोट्या बालकाचा मृत्यू झाला. केवळ युवराजांच्या हट्टापोटी भारतीय प्राणी / पक्षी सोडून परदेशी पेंग्विनवर दररोज रु.१.५ लाख रुपये खर्च करण्याऱ्या सत्ताधारी पक्षाला या बालमृत्यूचे सोयरसुतक नाही.

कारण ही घटना घडल्यानंतर नायर रुग्णालयात सत्ताधारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी कोणी फिरकले सुद्धा नाहीत अथवा अथवा त्यांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही. मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी रु. ४५०० कोटी खर्च करते.त्यानंतरही अशा घटना घडतात ही बाब अत्यंत वेदनादायी, चिंताजनक, निंदनीय व शरमेची असून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाला भूषणावह नसल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

सभा तहकुब करतानासुद्धा सत्ताधारी शिवसेनेने श्रेयवादाची लढाई लढलीच. भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांची सभा तहकुबी पहिली आली असताना त्यांना श्रेय मिळू नये म्हणून सभागृहाच्या नेत्या विशाखा राऊत यांनी झटपट सभा तहकुबी मांडली. या सभा तहकुबीवर साधक-बाधक चर्चा होऊन ती एकमताने मंजूर झाली आणि सभागृह कोणतेही कामकाज न करता पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
devendra fadnvis - ajit pawar

पुण्याचे पाणी कपात करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील – देवेंद्र फडणवीस

Next Post
UDDHAV THACKERAY - DR.BABASAHEB AAMBEDKAR

‘महाविकास आघाडी सरकारचे नकारात्मक धोरण बाबासाहेबांच्या साहित्य छपाईस मारक’

Related Posts
राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही -आमदार अनिल देशमुख

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही -आमदार अनिल देशमुख

Anil Deshmukh: आपल्या सर्वांना कल्पना आहे की, गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण चालू आहे व ते महाराष्ट्रातील…
Read More
Manoj Jarange Patil यांनी टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये, बच्चू कडूंचा सल्ला

Manoj Jarange Patil यांनी टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये, बच्चू कडूंचा सल्ला

Manoj Jarange Patil: ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. ओबीसीतून…
Read More

‘हा विषय वाद अथवा राजकारणाचा नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा’, चित्रा वाघ यांचे सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई- मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या पेहरावावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उद्धव…
Read More