धकाधकीच्या जीवनातील शीण घालवण्यासाठी शिणवार सज्ज

मराठी चित्रपट सृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विविध विषय घेऊन नवनवीन कलाकार सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. अशाच वातावरणात परी प्रॉडक्शन एक नवीन विषय घेऊन सर्वांसमोर येत आहे. वेगाने प्रगती करत असलेल्या या जगात अस्सल गावाकडची आगळी वेगळी प्रेमकथा दाखवणाऱ्या परी प्रॉडक्शन निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘शिणवार’ (Shinwar) या मराठी सिनेमाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी पुण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले उपस्थित होते.

यावेळी अनावरण सोहळ्याचे अध्यक्ष मेघराज भोसले (Meghraj Bhosle) यांनी शिणवार चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. विशेष म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातील शीण घालवणारा हा शिणवार नावाचा चित्रपट आहे. अस्सल गावराण मातीचा तडका असणाऱ्या या चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम पद्धतीने केली असल्याचे सांगत अनेक नवोदित कलाकारांचे स्वप्न साकार करणारा हा चित्रपट आहे अशा शब्दांत मेघराज भोसले यांनी चित्रपटाचे निर्माते विलास शिंदे, चित्रपटाचे दिग्दर्शक बाबासाहेब लाटे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले. सोबतच ग्रामीण भागातील गोष्टीवर आधारलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करेल अशी आशा यावेळी कार्यक्रमाचे निर्माते विलास शिंदे यांनी व्यक्त केली.

शिणवार या चित्रपटातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये चित्रपटात प्रमुख भूमिकेत राहुल शिंदे, परी पटेल, प्रशांत महाजन आणि शुभांगी देवकुळे दिसणार आहेत. चित्रपटाची कथा विलास शिंदे यांच्या निर्मितीतून तयार झाली असून चित्रपटाचे दिग्दर्शन बाबासाहेब लाटे यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून शरद नवगिरे यांनी जबाबदारी पार पाडली. चित्रपटाचे छायाचित्रीकरण नवनाथ पांढरे यांनी केले असून चित्रपटातील गाणी संतोष भालेराव यांनी निर्माण केली आहेत.

या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमात हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्राप्त शरद मोहोळ, स्वराद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ, शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे शहर संघटक युवराज कोकाटे, उद्योजक प्रदीप कावेडीया, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अनिल गुंजाळ, लेखक संजय नवगिरे, दिग्दर्शक उमेश थोरात, दिग्दर्शक समाधान देसले, दिग्दर्शक प्रशांत गेडाम, निर्माता संजय म्हस्के, दिग्दर्शक अप्पासाहेब मकोने, भाजपचे संकेत बिरामणे, पुणे मनपाच्या माजी नगरसेविका कविता वैरागे, अभिनेते दिग्दर्शक प्रशांत दिंडले, भरत वैरागे येत्या 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ढिनच्याक सिनेमाच्या संपूर्ण टीमसह अनेक मान्यवरांची मंदिआळी लाभली होती.