मनोज जरांगे माघारी फिरले, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला मागे

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis: ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावेळी त्यांनी शिवराळ भाषाही वापरली. तसेच फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले. त्यानंतर रात्री भांबेरी येथे मुक्काम केला. सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघणार होते. परंतु अचानक त्यांनी हा निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. मी एकटा जातो तुम्ही कोणी येऊ नका, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भांबेरी गावामध्ये मराठा आंदोलक दाखल होऊ लागले होते. राज्याच्या विविध जिल्ह्यातून मराठा आंदोलक भांबेरी गावामध्ये येत होते. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला येऊ नका असे आवाहन केले असले तरी आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही, असे आंदोलक म्हणत होते. सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पुन्हा माध्यमाशी बोलायला लागले. यावेळी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केला. आपण अंतरवाली सराटीत जात असून त्या ठिकाणी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार