काँग्रेसची कमाल : मुकूल वासनिक यांच्यासह ३ जागांवर मिळवला दणदणीत विजय

जयपूर – राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात (Rajya Sabha elections) मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने येथे तीन जागा जिंकल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांना ४३ मते मिळाली, तर मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांना ४२ मते मिळाली. वासनिक यांच्या खात्यावरील एक मत फेटाळण्यात आले आहे. घनश्याम तिवारी (Ghanshyam Tiwari) यांना 43 मते मिळाली. प्रमोद तिवारी यांना 41 मते मिळाली. त्याचवेळी डॉ.सुभाष चंद्र (Dr. Subhash Chandra) यांच्या खात्यात 30 मते आली. निवडणुकीत तीन जागा जिंकल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) म्हणाले. मी तिन्ही नवनिर्वाचित खासदार श्री प्रमोद तिवारी, श्री मुकुल वासनिक आणि श्री रणदीप सुरजेवाला यांचे अभिनंदन करतो. मला खात्री आहे की तिन्ही खासदार दिल्लीत राजस्थानच्या हक्कांची जोरदार वकिली करू शकतील.