मुंबई – महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरूच आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील आपले सरकार वाचवण्यासाठी भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलल्याच्या वृत्ताचा शिवसेनेने इन्कार केला आहे. असे शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान (Public Relations Officer Hershal Pradhan) यांनी मंगळवारी अधिकृतपणे सांगितले.
सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये असं प्रधान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पोहोचले आहेत. येथे ते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेऊन महाराष्ट्राच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान भाजप (BJP) काही मोठा निर्णय घेऊ शकते, असेही बोलले जात आहे.