ईच्छित फल प्राप्तीसाठी अशी करा घरातील देवांची पूजा…

पुणे : घरातील देवांची पूजा केल्याने घरातील वातावरणच नाही तर मन देखील प्रसन्न होते . तुम्ही आस्तिक असो अथवा नास्तिक परंतु घरात देवांची पूजा केल्याने विशिष्ट मंत्रोच्चार , धुप- दीपाच्या सुगंधाने मन प्रसन्न होते . तसेच पूजा करताना मन एकाग्र करून पूजा केल्याने दिवसभर कामात चांगले लक्ष लागते . त्यामुळे रोज पूजा करताना काही नियम नक्की पाळा , ज्यामुळे यश प्राप्ती नक्की मिळेल .

१. पूजा करताना नेहमी अंघोळीनंतर स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे .

२. पूजेला सुरुवात करताना नेहमी कपाळाला गंध अवश्य लावा . तसेच बसण्यासाठी आसनाचा उपयोग करावा . यामागील शास्त्रीय कारण आपण पुढील लेखामध्ये पाहूया.

३. देव पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य आपल्या जवळ घेऊन बसावे . देवांची पूजा हे एक प्रकारचे ध्यानच आहे . मन पूर्णपणे एकाग्र करून देवांची पूजा करावी . त्यामुळे एक प्रकारचे मानसिक बल तुम्हाला मिळेल .

४. देवपूजा करताना गंध, अत्तर आणि फुलांचा अवश्य उपयोग करावा . यामुळे सुगंधाने घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते .

५. सर्वात शेवटी पूजा झाल्यानंतर देवाची आरती करताना घंटानाद आणि तुपाचा दिवा लावायला विसरू नका . आरती आणि विशिष्ट मंत्रोच्चार तसेच घंटानाद यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते . गणेश आरती , कुलदेवता आरती आणि आपल्या गुरुचे ध्यान रोजच्या पूजेमध्ये करावे .

जर तुम्ही रोज देवपूजा करत नसाल तर मानसिक आरोग्यासाठी रोज १५ मिनिटे वेळ काढाच . तुमच्यातील एकाग्रता आणि पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये वाढ होण्यासाठी या पद्धतीने देवपूजा अवश्य करा . तुमच्यातील हीच पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला तुमच्या कार्यात यशस्वी होण्यास मदत करेन .