‘खान पाहिजे की बाण पाहिजे’ यावरून अस्मिता सुखावेल पण घसा कायमचा कोरडा राहतो – चौधरी

पुणे : – औरंगाबादला (Aurangabad) सध्या पाणी मिळत नाही. परभणीत (Parbhani) आठ दिवसाला एकदा पाणी हे नेहमीचं आहे. लातूरला (Latur) पंधरा दिवसाला पाणी येतं. (लातूरनं महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री आणि देशाला एक गृहमंत्री दिलेला आहे.) स्वर्गीय शंकरराव चव्हाण (Late Shankarrao Chavan) यांचा अपवाद वगळता मराठवाड्यात एकाही नेत्यानं पाणी या विषयात कोणतंही काम केलं नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी (Social worker Dr. Vishwambhar Chaudhary) यांनी आपल्या फेसबुक पोस्ट (Facebook Post) मधून केले.

पुण्याचं पाणी लवासानं (Lawasa City) पळवलं. पुणेकर इतके विद्वान की त्यांनी पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाला पाडून त्यांचे मित्र मोदी(Narendra Modi), नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पक्षाला बहुमत दिलं. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे विकास आघाडीचा प्रयोग केला, त्यांना नाकारून टाकलं. गडकरींनी लवासाला उघड समर्थन दिलं होतं. अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की गडकरी असं म्हणाले की, पवार त्यांची चार कामं करतात, ते पवारांची चार कामं करतात पुण्यातला एकही भाजप नेता (BJP Leader)  लवासाविरूद्ध बोलण्याची हिंमत आजपर्यंत करू शकलेला नाही. नेते नालायक आहेत हे उघडच आहे पण जनतेनं पाण्याच्या प्रश्नावर कधी मतदान केलं का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पाणी प्रश्नाबाबत (Water Crises) बोलताना ते म्हणाले की, पुण्यात विद्वानांचं प्रचंड बहुमत आहे पण पाण्याचा प्रश्न हा त्यांना प्रश्न वाटत नाही. परभणी, औरंगाबाद, लातूरचे लोक पाणी प्रश्नावर नेत्यांना जाब विचारत नाहीत. पाणी नसणे ही नेत्यांसाठी दुहेरी संधी असते. लोक बोंबलत तुमच्याकडे येत राहतात आणि टँकर लाॅबीकडून (Tanker Loby) पैसा मिळत राहतो. तिसरीकडे बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय वाढतो असे आपले परखड विचार चौधरी यांनी मांडले.

तुम्ही कोणत्या प्रश्नावर मतदान करता यावरून तुमचा प्राधान्यक्रम कळतो. ‘खान पाहिजे की बाण पाहिजे’ यावरून अस्मिता सुखावेल पण घसा कायमचा कोरडा राहतो असं विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.