ब्रेकिंग! ड्वेन ब्रावोची आयपीएलमधून निवृत्ती, २०२३मध्ये सीएसकेसाठी करणार ‘हे’ काम

Champion Bravo calls time on IPL playing career, stays with Super Kings as bowling coach

Dwyane Bravo: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याने शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) रामराम ठोकला आहे. ब्रावोने आयपीएलमधून निवृत्ती (Dwyane Bravo Retirement From IPL) जाहीर केली आहे. त्याची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे अधिकृत घोषणा केली आहे. अशाप्रकारे वेस्ट इंडिजचे दोन दिग्गज कायरन पोलार्ड आणि ब्रावो आयपीएलच्या आगामी हंगामात खेळताना दिसणार नाहीत.

३९ वर्षीय ब्रावोवर सीएसकेने नवीन जबाबदारी सोपवली आहे. तो आयपीएल २०२३ मध्ये सीएसकेचा गोलंदाजी प्रशिक्षक असेल. लक्ष्मीपती बालाजी काही कारणास्वत एका वर्षासाठी ब्रेक घेत आहे. त्याचमुळे ब्रावोवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान ब्रावो हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज राहिला आहे. त्याने त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीत १६१ सामने खेळताना १८३ विकेट्स घेतल्या आहेत. तो २०११ पासून सीएसकेचा भाग राहिला आहे. त्याने सीएसकेला २०११, २०१८ आणि २०२१ चे विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच तो आयपीएलमध्ये २ वेळा (२०१३ आणि २०१५) पर्पल कॅप जिंकणाराही पहिलाच खेळाडू आहे. ब्रावोने सीएसकेकडून १४४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १६८ विकेट्स आणि १५५६ धावा केल्या आहेत.