इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या विजयाचा भारताला फायदा, WTC Point Table मध्ये दुसऱ्या स्थानी उडी

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला आहे. राजकोटमध्ये त्यांनी पाहुण्या संघाचा 434 धावांनी पराभव केला. कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी भारताने 2021 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला होता. या मोठ्या विजयासह टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.

इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताचे सात सामन्यांतून 50 गुण झाले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी 59.52 वर पोहोचली आहे. भारताने 55 टक्के गुण मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे
दक्षिण आफ्रिकेवरील दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर न्यूझीलंड संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या गुणांची टक्केवारी 75.00 आहे. त्यांनी आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत. तर एकात संघाचा पराभव झाला आहे. 2023-25 ​​च्या मोसमात ऑस्ट्रेलियाने 10 कसोटी सामने खेळले आहेत आणि सहा जिंकले आहेत. कांगारूंना तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने सात कसोटी सामने खेळले असून चार जिंकले आहेत. टीम इंडियाने दोन सामने गमावले आहेत. एक कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं