आसाममधील पूरग्रस्तांना शिंदे गटातील आमदारांकडून मोठी मदत, एकनाथ शिंदेंची घोषणा

गुवाहाटी – महाराष्ट्रात सुरू असलेली राजकीय कोंडी आणखी वाढली आहे. एकीकडे गुवाहाटीमध्ये (Guwahati) राहणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांनी गुवाहाटीहून गोव्यात (Goa) येण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवसेनेला विधानसभेत बरेच काही सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढत आहेत. त्याचबरोबर अपक्ष आमदारही भारतीय जनता पक्षाच्या (BJP) बाजूने जाताना दिसत आहेत.

या सर्व घडामोडी घडत असताना आसाममधील पूर (Floods in Assam) सुद्धा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. यातच आता सध्या आसाममधील गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांकडून आसाममधील पूरग्रस्तांना (Flood victims) मदतीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.