Sanjay Raut | रात्रीस खेळ चाले, संजय राऊत यांचे नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसेने केला निषेध

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच आपल्या वाचाळवीरपणामुळे टीकेचे धनी ठरत असतात. त्यांनी नुकतेच अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. बळवंत वानखेडे यांच्याविरोधात नाचीची नाही, तर देशाची लढाई आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे, त्यांचा रात्रीस खेळ चाले, असंही म्हटलं आहे. आता संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन भाजपासह महायुतीतील मित्रपक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीकास्त्र सोडले आहे. नवनीत राणा यांच्याबाबत संजय राऊत यांनी ज्या भाषेचा वापर केला आहे हा समस्त महिलांचा अपमान तर आहेच, पण हा कला क्षेत्राचा सुद्धा अपमान आहे! अर्थात संजय राऊतांसारख्या लोकांकडून असलीच भाषा येणार! महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध करत आहे…. संजय राऊत गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे ते दिलगिरी वगैरे व्यक्त करतील याची अपेक्षाच नाही !, असे त्यांनी म्हटलंय.

याआधी सुद्धा कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करणं असे प्रकार त्यांनी केलेच आहेत. राजकारणाचा स्तर अशाच वाचाळवीरांमुळे घसरत चालला आहे. सुप्रिया सुळेंबाबत एक मंत्री असंच वादग्रस्त बोलले होते त्यावेळी देखील राजसाहेबांनी त्याचा निषेधच केला होता हे इथं आवर्जून सांगावं लागेल !!, असे योगेश खैरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले