एकनाथ शिंदेनी रात्री उशीरापर्यंत घेतली खासदारांची बैठक; ‘या’ महत्वाच्या विषयावर झाली चर्चा 

Mumbai News : सत्तासंघर्षातील निकाल बाजूने लागल्यानंतर आता शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल रात्री उशीरापर्यंत शिवसेना खासदारांची (Shivsena MPs) बैठक घेतली.

शिवसेनेकडे सध्या तेरा खासदार आहेत. यापैकी किती खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात? कुठल्या मतदारसंघामध्ये अधिक काम करावं लागेल. महाविकास आघाडीने निर्माण केलेलं आव्हान या विषयावर या बैठकीत सखोल चर्चा झाली. काल जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ ही मिटींग सुरू होती. १३ खासदार या बैठकीला उपस्थित होते.