कर्नाटक निवडणुकीमुळे कॉंग्रेसला मिळाला बुस्टर; आता महाराष्ट्रातही राबवणार ‘कर्नाटक पॅटर्न’!

Mumbai – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) भाजपला धूळ चारल्याने कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. हीच लय कायम राखण्यासाठी राज्यात देखील कॉंग्रेसने (Congress) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीप्रमाणेच विविध समाजिक घटकांना एकत्रित करून, आगामी निवडणुका जिंकण्याचे कर्नाटकी पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्याचा पक्षाने आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

काँग्रेस पक्षाला विजयाकडे घेऊन जाणारे हे कर्नाटकी मॉडेल महाराष्ट्रात राज्यातही राबविण्याचे पक्षानकडून नियोजित केले गेले आहे. मुंबईतच्या दादर येथील टिळक सभागृहात काल दि. २४ मे बुधवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये मुख्य म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाची चर्चा होती.

दरम्यान, कर्नाटकात भाजपाला अडचणीत आणणाऱ्या केंद्रीय लेव्हलच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र्रात देखील काम केले जाऊ शकते, असे मुद्दे कॉंग्रेसने अधोरेखित केले असून आगामी काळात त्याच मुद्यांवर कॉंग्रेस लक्ष केंदित करणार आहे. कर्नाटकात ज्या प्रमाणे स्वबळावर सत्ता आणली त्या पद्धतीने महाराष्ट्रात देखील सत्ता येईल असा विश्वास कॉंग्रेस नेत्यांना वाटू लागला आहे.