मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द

Mumbai – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. सततचे दौरे, सभा, कार्यक्रम यामुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली असल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला, असल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने सातत्याने विरोधकांकडून टिका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस आज पुन्हा दिल्लीला निघाले आहेत.