एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका; BMC मधील खास अधिकाऱ्यांची केली बदली

मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. दरम्यान, आता सत्तेचे सर्व सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर आता चांगलेच कामाला लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने (MVA government) घेतलेले काही निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या अधिकाऱ्यांची शिंदेंनी बदली केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धारावीचे कोविड-19 संकट हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांची दादर येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळा येथे बदली करण्यात आली आहे. दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे (Prashant sapkale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे सध्या पश्चिम उपनगरातील के/पूर्व (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत.

दरम्यान, सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळा प्रभागाचे प्रभारी मनीष वलंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिघावकर यांनी जी/उत्तर (जी/एन) वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी दादर, माहीम आणि धारावी परिसराचा तीन वर्षे समावेश केला आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे अशी ओळख आहे.