#BoycottLaalSinghChaddha : लोकांच्या भावना आणि श्रद्धेची चेष्टा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे ? वीर महानचा सिनेनिर्मात्यांना सवाल 

नवी दिल्ली – WWE चा कुस्तीपटू वीर महान उर्फ रिंकू सिंगने देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपटांवर आणि वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ जारी केला आहे तेव्हापासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘बॉलिवुडवर बहिष्कार टाका’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाका’ असा ट्रेंड सुरू झाला आहे. वीर महानने आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे नाव दिलेले नसले तरी आमिर खानने ‘पीके’ चित्रपटात चित्रित केलेल्या दृश्यांमुळे युजर्स विविध प्रकारे कमेंट करत चित्रपट निर्मात्यांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.

वीर महानच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की,  गदी बरोबर सर, आता जबरदस्त निषेध व्हायला हवा आणि अशा लोकांना समाजातून उखडून टाकायला हवे. जय श्री राम.. जय हिंद जय भारत. दुसर्‍या यूजरने कमेंट केली की, बरोबर आहे भाऊ! या लोकांना फक्त पैसे कमवायचे आहेत. त्यांना त्यांच्या संस्कृतीशी, देशाशी, इतिहासाशी काही देणेघेणे नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.

व्हिडिओमध्ये रिंकू राजपूत म्हणाला, सोशल मीडियावर मी अनेक चित्रपट आणि वेब सीरिजच्या क्लिप पाहिल्या आहेत. ज्यात उघडपणे आपल्या देवी-देवतांचा अपमान केला जातो.आपल्या भारतीय संस्कृतीची आणि सभ्यतेची खिल्ली उडवली जाते.लोकांच्या भावना आणि श्रद्धेची चेष्टा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे?  जगाची संस्कृती, सभ्यता आणि इतिहास तुम्ही त्या देशाच्या संस्कृतीची आणि सभ्यतेची चेष्टा करत आहात आणि ते अश्लीलतेने दाखवत आहात. मी तुम्हा सर्व देशवासियांना विनंती करतो, एकत्र या, लोकांच्या भावनांशी खेळणारे चित्रपट आणि वेब सिरीजवर बहिष्कार टाका. आणि देश आणि धर्म लक्षात ठेवा. हर हर महादेव! असं त्याने म्हटले आहे.