शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस; आदित्य ठाकरेंचे नाव वगळले

मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. दरम्यान,आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप झुगारून मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १४ आमदारांना शिंदे गटाकडून आपात्रतेची नोटीस पाठण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिली. गोगवले यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रारही दाखल केली होती.

दरम्यान बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर असल्यामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांचे नाव अपात्रतेसाठी दिलेल नाही. मात्र, यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असे भरत गोगावले म्हणाले.

https://twitter.com/Sasanka_Sekh/status/1543981916054884352?s=20&t=OL9FMI6vve2_fwH96nOCLA