Elon Musk : 180 अब्ज डॉलर्स गमावणारे एलोन मस्क ठरले जगातील पहिले उद्योगपती, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आले नाव

Elon Musk Personal Wealth : टेस्लाच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर, त्याचे प्रमुख एलोन मस्क यांच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये या घसरणीनंतर, एलोन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीत एक विश्वविक्रम केला आहे, ज्यानंतर त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) समाविष्ट केले गेले आहे. एलोन मस्क (Elon Musk) यांची गेल्या एका वर्षात 180 अब्ज डॉलरची संपत्ती कमी झाली आहे. फोर्ब्स मासिकानुसार, 2021 मध्ये, एलोन मस्कची मालमत्ता $ 320 अब्ज होती, जी जानेवारी 2023 मध्ये केवळ $ 138 अब्ज इतकी कमी झाली.

एवढ्या कमी वेळेत संपत्ती गमावण्याच्या बाबतीत इलॉन मस्कने 22 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आतापर्यंत हा विक्रम जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोन यांच्या नावावर होता, ज्यांनी 2000 मध्ये $ 58.6 अब्ज गमावले. पण आता इलॉन मस्कने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अलीकडील अहवालानुसार, एलोन मस्कने $200 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे आणि ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या व्यक्तीने $200 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. इलॉन मस्कच्या संपत्तीत इतकी घसरण झाली की त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जाही गमावला. फ्रेंच लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे प्रवर्तक बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी मस्कची छेड काढली. बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती 190 अब्ज डॉलर्स आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहे.

इलॉन मस्क हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत होण्याचा मानही हिसकावून घेण्याच्या मार्गावर आहे. भारताचे गौतम अदानी (Gautam Adani) एलोन मस्क यांना कधीही मागे टाकू शकतात. एलोन मस्कची संपत्ती $130 बिलियन आहे, तर गौतम अदानी त्याच्या मागे फक्त $10 बिलियन आहेत आणि त्यांची संपत्ती $120 बिलियन आहे.

इलॉन मस्कने ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून, टेस्लाच्या (Tesla) स्टॉकमध्ये सातत्याने घट होत आहे. त्याचा निर्णय बाजाराला आवडला नाही. इलॉन मस्क ट्विटर चालवण्यासाठी टेस्लाचे अधिक शेअर्स विकू शकतात असे बाजाराला वाटते.