पुणे मेट्रोचा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी खूप दिव्यातून जावे लागले; झगडेंनी व्यक्त केल्या भावना  

 पुणे – पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते पायाभरणी झालेल्या 32 किलोमीटर पैकी 12 किलोमीटर मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच झालं. पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकाची पाहणी तसच तिथल्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. डिजिटल तिकीटाची खरेदी करून त्यानंतर त्यांनी गरवारे ते आनंदनगर स्थानकापर्यंत मेट्रोनं प्रवासही केला.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता माजी आयुक्त महेश झगडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, पुणे मेट्रोचे उदघाटन मा पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे याबाबत मनस्वी आनंद आहे. हा प्रकल्प मी महापालिका आयुक्त असता ना प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी खूप दिव्यातून जावे लागले, मनःस्ताप सहन करावा लागला पण शेवटी तो PMC ने मंजूर केला.

तो मंजूर होऊ नये म्हणून कांही पक्ष , सामाजिक संघटना , आर्किटेक्ट् असोसिएशन इ प्रचंड विरोध केला, अडथळे आणले. पण अनेक पक्षांनी, सामाजिक संगठनांनी , प्रसार माध्यमांनी खूप मदतही केली. पुणेकरांचे अभिनंदन !!  असं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.