भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आम्हीही इथे….’

Pat Cummins On Final Against India: आयसीसी वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारताने आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर ऑस्ट्रेलियन संघाला 2 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भारताविरुद्धच्या एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) सर्व प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. यामध्ये त्याने खेळपट्टीबाबत मोठे वक्तव्यही केले आहे.

दोन्ही संघांसाठी खेळपट्टी सारखीच असेल
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला जेव्हा अंतिम सामन्याच्या खेळपट्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले की खेळपट्टी दोन्ही संघांसाठी सारखीच असणार आहे. घरच्या मैदानावर जेव्हा तुम्ही स्वतःच्या खेळपट्टीवर खेळता तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळतो यात शंका नाही, पण आम्हीही इथे बरेच दिवस भरपूर क्रिकेट खेळलो आहोत. वानखेडेवर या मैदानावर नाणेफेक तितकीशी महत्त्वाची ठरणार नाही. दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. संघाने मागील 8 सामन्यात सलग विजय नोंदवले आहेत.

गेल्या सामन्यात विराटचा झेल सोडणे ऑस्ट्रेलियाला महागात पडले
भारतीय संघाने साखळी टप्प्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि केएल राहुलने शानदार अर्धशतकी खेळी केली. पॅट कमिन्सनेही या सामन्यातील पराभवाबाबत सांगितले की, आम्ही विजयापासून फक्त एक झेल दूर होतो, त्यात कोहलीचा झेल सोडणे आम्हाला चांगलेच महागात पडले. तथापि, आम्ही या भारतीय संघाविरुद्ध यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे, जी या सामन्यातही पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

महत्वाच्या बातम्या-