एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार

मुंबई : मनसुख हिरेन खून (Mansukh Hiren Murder Case) प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. एनआयएकडून (NIA) मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) हे मनसुख हिरेन यांच्या हत्ये मागचे मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.

एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर (Mumbai High Court) याबद्दलचं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये सचिन वाजे यांच्यासह पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांची देखील नावं समोर आली होती.

प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्ताच्या इमारतीत रचण्यात आला होता. जिथे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते. सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख दिले होते. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएने दाखल केलेले प्रतिज्ञापत्रत माहिती देण्यात आलेली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.