माझ्या मतदारसंघात येऊन पहा मी हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते केलेत – गुलाबराव पाटील

जळगाव : सध्या राज्यभरात नगरपंचायत निवडणूकींची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली आहे.

गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केलाय.

तर, राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर देखील गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं. मुडंक शिवसेनेचं कंबर भाजपची आणि पाय राष्ट्रवादीचे कुठे चाललंय हे. यामध्ये बदल व्हायला हवा सर्व एकच असायला हवं. राज्यात पालकमंत्री शिवसेनेचा, नगर विकास मंत्री शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा असंच व्हायला हवं, अंस गुलाबराव पाटील म्हणाले.