अचानक घरी जाऊन आईला नववर्षाचे सरप्राइज देणार होता रिषभ पंत, पण रस्त्यातच घडली दुर्घटना

Rishabh Pant Accident: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. रुरकीला परतत असताना रुरकीच्या गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. पंतच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (Some videos and some pictures of Rishabh Pant’s accident) भारतीय स्टार क्रिकेटरची काही छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यात गंभीर जखमा दिसत आहेत. (Rishabh Pant Accident latest update)

ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. या अपघातानंतर त्यांच्या गाडीला भीषण आग लागली. अपघातानंतर पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्लास्टिक सर्जरी होणार आहे.(How did Rishabh Pant’s accident happen?) तसेच त्याच्या कपाळाला आणि पाठीलाही इजा झाल्या आहेत.

पंत एकटाच रात्री उशीरा दिल्लीहून रुरकीला परतत असताना हा अपघात झाला आहे. कार चालवत असताना डोळा लागल्याने त्याची कार डिव्हायडरला धडकली असल्याचे समजत आहे. यानंतर पंत ड्रायव्हरविना एकटाच इतक्या उशीरा रुरकीला का जात होता?, हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. तर पंत त्याच्या आईला नववर्षाचे सरप्राइज देऊ इच्छित (Rishabh Pant Wants To Surprise His Mother) होता. याचसाठी तो रात्री उशीरा एकटा दिल्लीहून रुरकीला जाण्यासाठी निघाला. त्याने घरीही कोणाला आपण येत असल्याची कल्पना दिली नव्हती. पंतने नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पुढील ३ दिवस उत्तराखंडमध्ये घालवण्याचा प्लॅन बनवला होता. परंतु अर्ध्या रस्त्यात त्याच्यासोबत हा अपघात घडला.

आनंदाची बातमी म्हणजे, पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो बोलू शकत असून त्याने पोलिसांना स्वत: अपघाताबद्दल संपूर्ण माहिती दिली असल्याचेही समजत आहे. देहराडून मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.