ODI World Cup: विश्वचषकात ‘या’ 5 यष्टीरक्षक फलंदाजांवर सर्वांच्या नजरा असतील

Top 5 Wicket Keeper 2023 ODI World Cup: 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीवर जगभरातील चाहते आणि क्रिकेटपंडित लक्ष ठेवतील. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वांच्या नजरा कोणत्या पाच यष्टीरक्षक फलंदाजांवर खिळल्या आहेत त्यांच्याबाबत या लेखातून जाणून घ्या.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हा या विश्वचषकात त्याच्या संघाचा मुख्य दुवा आहे. राहुल विश्वचषकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. आशिया कपमध्ये पुनरागमन करताना राहुलने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून आपली लय अबाधित असल्याचे सिद्ध केले आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात राहुल अनेक मोठ्या खेळी खेळू शकतो आणि एकट्याने संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हणणार आहे . एकदिवसीय सामन्यातही तो त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. डी कॉकचा हा शेवटचा विश्वचषक आहे आणि या स्पर्धेनंतर तो कधीही देशासाठी एकदिवसीय फॉर्मेट खेळणार नाही. अशा स्थितीत त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) कोणत्याही क्रमाने फलंदाजी करण्यात पटाईत आहे. यासोबतच तो आपल्या झंझावाती फलंदाजीने कोणत्याही गोलंदाजीचे आक्रमण उद्ध्वस्त करू शकतो. यावेळी विश्वचषकात सर्वाधिक फलंदाजीचे ट्रॅक उपलब्ध असतील. अशा स्थितीत बटलरच्या झंझावाती फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा असतील.

पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) सतत धावा काढण्यासाठी ओळखला जातो. रिझवान हा विश्वचषकातील पाकिस्तानी फलंदाजीचा कणा आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावून रिझवानने विश्वचषकात कोणत्या शैलीत फलंदाजी करणार हे स्पष्ट केले आहे.

याशिवाय बांगलादेशच्या फलंदाजीचा मुख्य दुवा म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास (Litan Das). दास सुरुवातीपासूनच वेगवान धावा करण्यात पटाईत आहे. बांगलादेशला विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल तर लिटनसाठी धावा करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण