एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत ते नाराज असल्याच्या चर्चा कोणीही करु नका – पवार

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीबाबत शाशंकता व्यक्त केली जात होती. अखेर मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Deputy Chief Minister Ajit Pawar) दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाही आहे. त्यामुळे आम्हीच त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. आराम करण्यासाठी ते त्यांच्या मुळगावी गेले असल्याने ते आजच्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा कोणीही करु नये.