दिग्गज नेत्यांची खोटी आश्वासने सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अपयश लपवू शकत नाहीत : आप

पणजी – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची खोटी आश्वासने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अपयश लपवू शकत नाहीत, असे म्हणत आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांनी खाण अवलंबितांना खोटी आश्वासने दिल्याबद्दल भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.

नुकत्याच झालेल्या गोव्याच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले यांनी , गोव्यातील खनिजाचे विधानसभा निवडणुकीनंतर पारदर्शक लिलाव प्रक्रियेसह पुन्हा कार्यान्वित केला जाईल अस म्हणाले होते

भाजपने राज्यात दहा वर्षे राज्य केले आहे. मग राज्यातील खाणकाम सुरू करण्यापासून भाजप सरकारला कोणी रोखले? अस शहा याच्या आश्वासनावर प्रतिक्रिया देताना पालेकर म्हणाले. भाजप सरकार अकार्यक्षम असून निस्वार्थी हेतूने कोणतेही काम करत नाही, असा दावा पालेकर यांनी केला. “खोटी आश्वासने देऊन गोवेकरांना मूर्ख बनवणे बंद करा” अस ते म्हणाले

दिल्लीतील आप सरकारने काम केले असेल, तर लोकांनी मतदान करावे, असे सांगण्याचे धाडस दाखवले होते. पण भाजपमध्ये ही हिंमत नाही कारण त्यांनी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे खोटे पसरवण्यासाठी इतर राज्यातून वरिष्ठ नेत्यांना गोव्यात बोलावावे लागले असल्याची टीका त्यांनी केली. भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांना गोवेकर बळी पडणार नाही याची खात्री करा. पक्षाने काही काम केले असेल तरच मतदान करा अस सांगण्याचे धाडस केवळ ‘आप’ करते अस ते म्हणाले.