शेतकरी नेते प्रसाद खामकर यांच्या मागणीला यश

Farmer : राज्यातिल कांद्याची पाहणी करन्यासाठी केंद्र सरकारचे (Central Govt) पथक 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र दौरावर आले होते , हे पथक 6 तारखेला बीड जिल्ह्यतील कांदा पाहणी करुण नगर मुक्कामी आले होते . पारनेर तालुक्याचे युवा शेतकरी  प्रसाद खामकर (Prasad Khamkar) यानी पारनेर तसेच श्रीगोंदा तालुक्यातिल कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) यांच्या समवेत केंद्रिय पथकाची सरकारी गेस्ट हाऊस नगर येथे भेट घेतली होती आणि पारनेर आणि श्रीगोंदा कांदा उत्पादक शेतकरी यांच्या वतिने कांदा निर्यात बंदी उठवन्याबाबत निवेदन दिले होते आणि बैठक झाली होती त्यामध्ये , अहमदनगर जिल्हा राज्यातिल दुसरा सर्वात जास्त मोठा कांदा उत्पादक जिल्हा आहे , अहमदनगर जिल्हयामधिल कांदा लागवड , उत्पादन आणि जिल्हा बाजार समिती मधिल मागिल 3 महिण्यांची आवक या संदर्भत सविस्तर महिती दिली होती , ति महिती सदर पथकाचे प्रमुख सुभाष चंद्र मीना , संचालक यानी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव  रोहित कुमार सिंह याना सादर केला होता.

त्या आहवालाच्या आधारे सचिव रोहित कुमार सिंह यानी कांदा निर्यात बंदी उठवली आहे केंद्र सरकारने 3 लाख टन कांदा निर्यात करन्याचा निर्णय घेतला आहे आशी महिती संचालक सुभाषचंद्र मीना यांच्या कडुन  प्रसाद खामकर याना मिळली. खामकर यानी केंद्रिय टिमचे सदस्य ज्यामध्ये  सुभाषचंद्र मीना (भारतीय आर्थिक सेवा ) संचालक , ग्राहक व्यवहार विभाग , भारत सरकार , श्री बी. के प्रुष्टी , सल्लागार , कृषी मंत्रालय ,  पंकज कुमार पासवान, उपसंचालक , कृषी मंत्रालय भारत सरकार , मनोज के आवर सचिव , कृषी मंत्रालय यांचे अहमदनगर जिल्हा कांदा उत्पादक शेतकरी यांच्यावतीनें आभार व्यक्त केले आहेत. या अहमदनगर जिल्ह्यतील कांदा उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल