IND vs PAK : “यंदाचा वर्ल्ड कप भारताचाच”, टीम इंडियाचा ‘खेळ’ पाहून पाकिस्तानी खेळाडूचं विधान

IND vs PAK World Cup : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) १ लाख ३० हजार लोकांपुढे पुन्हा एकदा भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला वनडे विश्वचषकाच्या थरारक सामन्यात पराभूत केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा विजयाचा खरा अर्थाने शिल्पकार राहिला. नाणेफेकीनंतर गोलंदाजीचा चपळ निर्णय घेण्यापासून ते धुव्वादार फलंदाजीपर्यंत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला. तसेच स्पर्धेतील विजयाची हॅट्रिकही पूर्ण केली.

पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू तन्वीर अहमदने (Tanveer Ahmed) या पराभवानंतर बाबर आझमच्या (Babar Azam) संघावर सडकून टीका केली. सलामीवीर इमाम-उल-हकवर अहमदने खालच्या पातळीवर टीका केली. याशिवाय शादाब खान, इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद नवाज यांनाही त्याने लक्ष्य केले.

तन्वीर अहमदने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, “पाकिस्तानी संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताविरूद्धचा सामना एकतर्फी झाल्याने मजा गेली. पाकिस्तानी खेळाडू संघासाठी नव्हे तर स्वत:साठी खेळतात हे स्पष्टच झाले. टीम इंडियाची कामगिरी शानदार होती त्यामुळे मला वाटते की, यंदाचा विश्वचषक भारताचाच आहे यात शंका नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा