Gautami Patil Viral Video: गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ शूट करणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे-  काही दिवसांपूर्वीच डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या बदनामीचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यातील (Pune) एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना गौतमीचे अश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस (police) स्टेशनला गौतमी कडून तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पुणे पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या मुलाला ताब्यात घेण्यात आले. गौतमीने केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.