Uddhav Thackeray | शाहू महाराजांच्या प्रचारासाठीही येणार आणि महाराजांना विजयी करणार

Uddhav Thackeray | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या 57 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात महाराष्ट्रातील नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

या यादीनुसार, शाहू महाराजांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झालीय. यानंतर उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली. कोल्हापुरात न्यू शाहू पॅलेसमध्ये भेट झाली. शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) स्वागत केलं.

यावेळी शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंची गळाभेट घेतली. ठाकरे कुटुंबीयांचे आणि शाहू महाराजांचे ऋणानुबंध आमच्या आजोबांच्या काळापासून आहेत, असं उद्धव ठाकरेंनी भेटीनंतर म्हटलं. शाहू महाराजांच्या प्रचारासाठीही येणार आणि महाराजांना विजयी करणार, अशी ग्वाही ठाकरेंनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात