गौतमी पाटीलने हात जोडून मागितली अजित पवारांची माफी; नेमके काय आहे प्रकरण?

पुणे : गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, अशी तंबीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तिला आपल्या मंचावर नृत्यासाठी कुणीही बोलावू नये, अशी ताकीदच अजित पवार यांनी दिली. सोबतच लावणीच्या नावाखाली अश्लील डान्सचा प्रकार होत असेल, तर हा मुद्दा अधिवेशनात मांडणार, असा अजित पवार यांनी म्हटलं होतं. यानंतर गौतमी पाटील (Gautami Patil) हिने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची माफी मागितली आहे.

प्रकरण चांगलेच तापू लागल्याने आता गौतमी पाटील हिनं अजित पवार यांची माफी मागितली आहे. गौतमी पाटील म्हणाली, दादा खूप मोठे आहेत. मी त्यांना काही बोलू शकत नाही. दादा जसं म्हणतील तसं. फक्त मला एकचं म्हणायचं आहे की, मी कुठं चुकतेय. जे चुकलं त्यावेळी माफी मागितली होती. तिथून पुढं माझ्याकडून काही चूक झाली नाही.

गौतमी पाटील म्हणाली की, मी व्यवस्थित डान्स केला. तरीही परत मलाचं ट्रोल (Troll) का केलं जाते. चूक झाली. मी माफी मागितली. सर्वांनी माफ केलं. तरीही मला ट्रोल केलं जातं. काही लोकं मला बोलतात. मला एकटीलाच का ट्रोल केलं जातं, असा प्रश्न तिनं उपस्थित केला.माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही? असा सवालही गौतमीने विचारला.