गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर शतक पूर्ण केले, OMG 2 नेही मोठी कमाई केली

बॉक्स ऑफिससाठी (Box Office) रविवार हा वर्षातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक ठरला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या गदर 2 (Gadar 2) आणि OMG 2 या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट गदर २ ने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. याशिवाय रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटानेही चांगली कमाई केली आहे.

व्यापार विश्लेषक सुमित कडेल यांच्या मते, सुरुवातीच्या अंदाजानुसार, गदर 2 ने पहिल्या दिवशी 50 कोटी ते 53 कोटी रुपये कमावले आहेत. याआधी चित्रपटाने शुक्रवारी ४०.१० कोटी, शनिवारी ४३.०८ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत शतकी कमाई केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या निमित्ताने चित्रपटाच्या कमाईत कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमारच्या OMG 2 या चित्रपटाने रविवारी 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याआधी चित्रपटाने शुक्रवारी 10.26 कोटी, शनिवारी 15.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. गदर 2 सोबत संघर्ष असूनही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. गदर 2 3500 स्क्रीन्सवर रिलीज झाला. तर, ओ माय गॉड 2 1500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जेलरने तीन दिवसांत भारतात 108.4 कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर चौथ्या दिवशी चित्रपटाची कमाई 38 कोटी रुपये आहे. जेलरची एकूण कमाई 146.40 कोटी रुपये आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत जेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.