‘आव्हाड साहेब… तुम्हा लोकांना एक पारदर्शी परीक्षा घेता नाही येत… ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे’

मुंबई : सरकारच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आला आहे. कारण म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे अशी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय

‘सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो’.

दरम्यान, आव्हाड यांनी ही घोषणा करताच एकच उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेकांनी आव्हाड यांच्या या पोस्ट खाली अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात अशाच काही प्रतिक्रिया .