अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; पवारांच्या पाठपुराव्याला यश

Ajit Pawar – अल्पसंख्याक समाजाच्या (minority community) विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गेल्या आठवड्यात (दिनांक २१ सप्टेंबर) विशेष बैठक घेण्यात आली होती. त्याबैठकीत महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या चर्चेला मूर्त स्वरुप प्राप्त झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान अल्पसंख्याक समाजाच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या योजनेचा २७ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. क्यूएस वर्ल्ड रॅन्कींगमधील २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी पीएचडी अभ्यासक्रमासाठी बिनशर्त प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती राहील. याकरिता १० कोटी ८० लाख इतक्या खर्चास देखील मंजुरी देण्यात आली.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी यासाठी एकूण १० शिष्यवृत्ती तर औषधी व जीवशास्त्र, लिबरल आर्ट व ह्युमॅनिटीजसाठी प्रत्येकी ६, शेतकीसाठी ३ आणि कायदा व वाणिज्यसाठी २ अशा या २७ शिष्यवृत्ती राहतील.

अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात गेल्या आठवड्यातच ( दिनांक २१ सप्टेंबर ) आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाच्या माध्यमातून अंमलबजावणी होताना दिसत आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. अल्पसंख्याक समाजाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात येत असून बैठकीत झालेल्या अन्य निर्णयाला सुद्धा लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole