Vasant More Resigns | ताकद असूनही निवडणुकीत उतरवलं नाही, पोस्ट टाकल्यानंतर रात्रभर झोपलो नाही; वसंत मोरे ढसाढसा रडले

Vasant More Resigns | काही दिवसांपूर्वीच मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या मनसेतून बाहेर पडण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता पत्रकार परिषद घेत वसंत मोरेंनी मनसेच्या प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resigns) राजीनामा दिला आहे. यावेळी वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला. वसंत मोरे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.

मनसेसाठी पुण्यामध्ये एवढं चांगलं वातावरण असतानाही मला लोकसभा निवडणूक लढवू दिली नाही, पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो पण काही लोकांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरे यांच्याकडे चुकीचे अहवाल पाठवले. वसंत मोरे हा खासदार होऊ शकतो असं मी सांगितलं होतं. पण वसंत मोरे हा स्वकेंद्रीत राजकारण करतोय असं वरिष्ठांना सांगितलं गेलं. या आधीही मी वेळोवेळी राज साहेबांकडे याची तक्रार केली होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही. मी या आधी एकनिष्ठतेचा कळस केला, आता राजीनामा देऊन परतीचे दोर स्वतः कापले असं सांगताना वसंत मोरे ढसाढसा रडल्याचं दिसून आलं.

मी काल रात्रभर झोपलेलो नाही, मी काल रात्री पोस्ट केली पण त्यावर कुणीही विचारलं नाही. आता राजीनामा दिल्यानंतर यांचे फोन आले असं वसंत मोरे यांनी सांगितलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य